दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर: बहिण भावाच्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन होय.रक्षाबंधन उत्सव हा बहिणभावांचा सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन हा उत्सव येतो.हिंदू कालगणनेनुसार श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.भारतीय संस्कृतीत या उत्सवाला फार महत्त्व आहे.

भावाने बहिणीचे रक्षण करावे ही या मागची प्रमुख भूमिका आहे.तसेच बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे नाते रक्षाबंधन या उत्सवातून दिसून येते.

महाराष्ट्रमध्ये हा उत्सव घरोघरी,सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी राखी खरेदीच्या माध्यमातून मोठे आर्थिक उलाढाल होते.

भोकरदन तालुक्यातील राजुर येथे जिईएस एज्युकेशनल ग्रुपमध्येही चिमुकल्याने रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदात साजरा केला.याप्रसंगी मुलींनी मुलांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. विद्यार्थिनींनी शिक्षकांनाही राख्या बांधल्या.

याप्रसंगी संस्थाअध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पुंगळे शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे,शिक्षक सुदर्शन रामटेके, दत्तू ठोंबरे ,विष्णू मिसाळ,दिपक डवले ,गणेश मोरे,प्रमोद जाधव,कुलदीप गिरी ,सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे,वरद पुंगळे ,नारायण नवले, किशोर पवार,संदीप साळवे,रामेश्वर कुटे,भूषण यादव यांची उपस्थिती होती.तसेच शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी, अनिता शेजुळ ,मीरा गोरे ,वंदना थोटे,उषा जाधव, माधवी माने,नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे ,वर्षा दळवी ,अनिता उगले, उषा जाधव,छाया शेंडे,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर,सुनील गटकाळ,बाबासाहेब जाधव इत्यादीजण उपस्थिती होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!