दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येथील जीईएस ग्रुपच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून खांद्यावर भगवी पताका,डोईवर तुळशी वृंदावन,टाळ मृदंगाच्या तालावर पावलीचा ठेका घेत ज्ञानोबा,तुकोबांचा जयघोष करत जय हरी विठ्ठलाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात दिंडी काढली होती.रोज विद्यार्थ्यांची शाळा भरते परंतु आज विठ्ठल नामाची शाळा भरल्याने शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्माई व वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.वारकऱ्यांचा वेश परिधान करून कपाळावर चंदनाचा टिळा,बुका,डोक्यावर तुळशीवृंदावन ,सजवलेल्या पालखीसह टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली होती. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.भक्तिमय वातावरणात दिंडीचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक-अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पुंगळे,मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे,शिक्षक सुदर्शन रामटेके,दत्तू ठोंबरे,विष्णू मिसाळ,दिपक डवले ,गणेश मोरे, प्रमोद जाधव,कुलदीप गिरी,सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे, वरद पुंगळे ,नारायण नवले, किशोर पवार,संदीप साळवे, रामेश्वर कुटे, भूषण यादव,मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी, अनिता शेजुळ ,मीरा गोरे ,वंदना थोटे, उषा जाधव,माधवी माने,नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे ,वर्षा दळवी,अनिता उगले, उषा जाधव,छाया शेंडे,शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर, सुनील गटकाळ,बाबासाहेब जाधव यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
