दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र पैठण: तालुक्यातील पाचोड येथे आज भाजपसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती भव्य मेळावा संपन्न झाला.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे दानवे , पालकमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक प्रचारातील विविध अनुषांगिक बाबींवर चर्चा करून, प्रचाराकामाचा आढावा घेण्यात आला.गेल्या दहा वर्षाच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या जनकल्यांकरी योजनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नामदार संदीपान भुमरे, माजी आ.सुभाषराव साबणे,नंदलाल काळे,रविंद्र शिसोदे, विनोद बोंबले,सोमनाथ परदेशी,आण्णाभाऊ लबडे,नंदू काका पठाडे, किशोर चौधरी, कल्याण गायकवाड,दामोधर नवपुते,भाऊराव मुळे,सजनराव मते,सूरज लोळगे,राजेंद्र तांबे,प्रकाश जाधव, गणेश बापु फुके,दादा बारे,काकासाहेब टेके, कृष्णा चव्हाण, मनोज धनवट,मंगेश गावंडे,कृष्णा पवार, शिवाजी काकडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!