दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ देशाचे केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांची आज दिनांक 8 मे बुधवार रोजी सायंकाळी चारच्या सुमारास जालना येथील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानात महाविजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

या सभेस महायुतीची उमेदवार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे ,शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. अरविंदराव चव्हाण,रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष ऍड. ब्रह्मानंद चव्हाण,रासप नेते ओमप्रकाश चितळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष रवीभैया राऊत,रिपाइं कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आठवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे ,भास्करराव दानवे यांसह महायुतीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाविजयी संकल्प सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून वातानुकूलित सभा मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले असून महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे.देशाचे गृहमंत्री हे जालना शहरात येणार असल्याने त्यांच्या सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होनार म्हणून जालना पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागोजागी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

या महाविजयी संकल्प सभेस युतीच्या सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!