दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा ठरवून ही निवडणूक सर्व समाज घटकांच्या सहकार्यातून पार पडावी म्हणून जालना लोकसभा मतदार संघातील धनगर समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

ही बैठक उत्साहवर्धक आणि निडणुकीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल वातावरणात पार पडली.या बैठकीत मतदार संघातील संपूर्ण धनगर समाज हा भाजपा व महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीसाठी कपिल दहेकर, नारायण दादा चाळगे, बळीराम खटके,गणेश कोल्हे, बाळासाहेब तायडे, श्रीराम सोरमारे महाराज, लक्ष्मण घोलप, डॉ गंगाधर पांढरे, बाबासाहेब गडकर, कचरू विरे,रामेश्वर बकाल, एकनाथ कानुले, भगवान माथले, संजय आटोळे, पंडित मतकर, शिवराम विर, अक्षय आटोळे, नारायण रिठे,शेषराव कोरडे सुखदेव खडेकर, दत्ता मैंद, नारायण रांधवन,अंकुश जारे यांची उपस्थिती होती.त्याच प्रमाणे संतोष रांधवन,कारभारी आदबाणे, किसनराव सोलाट,सांडू जोशी,प्रल्हाद नेमाने,दिगांबर सातपुते,शिवाजी चोरमारे गणेश गुंजाळ,साईनाथ पांढरे,ज्ञानेश्वर सोरमारे, बाबासाहेब खरात,राहुल भावले विष्णू सोलाट,प्रभाकर शेळके,भगवान कोल्हे कृष्णा गायके,रामा जोशी यांच्यासह इतरही मान्यवर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!