दर्पण सह्याद्री न्यूज

भोकरदन: जालना लोकसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाज बांधवांसाठी आपण आजतागायत हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. भविष्यातही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन अल्पसंख्याक बांधवांचा सर्वांगीण विकास साधणारा असे प्रतिपादन जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. भोकरदन येथे अल्पसंख्यांक मेळाव्यात त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमास मुस्लिम समाज बांधवांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवल्याचे दिसून आलेपुढे बोलताना ना. दानवें म्हणाले की मागील 60 वर्षात काँग्रेसने मुस्लिम व्होट बँक तयार करून फक्त निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लिमांचा वापर करून घेतला.एवढ्यावर न थांबता कांग्रेसने भाजपबद्दल द्वेष पसरून तुष्टीकरणाचे राजकारण केले. ही बाब आता मुस्लिम समाजाच्याही लक्षात आली आहे.याउलट मोदी सरकारने मुस्लिम तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.स्पर्धेत टिकण्यासाठी मदरशातील पारंपरिक शिक्षणाबरोबरच संगणक, विज्ञान, गणित,इंग्रजी, स्पर्धा परीक्षा यांसारखे आधुनिक शिक्षणाची कास धरल्यास यात समाजाचे हीत आहे हे जाणून मोदी सरकारने देशभरात 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशीप देण्याची योजना आखली आहे.यासाठी अल्पसंख्यांक मंत्रालयाचं बजेट दुप्पट केल्याचे ना.दानवेंनी सांगितले. याप्रसंगी आ.संतोष दानवे,आ.नारायण कुचे, भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,अतिक खान, मुसाशेठ सौदागर, इकबाल पठाण, मुश्ताक पठाण यांसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मुस्लिम समाज भाजपसोबत : इद्रिस मुलतानीकाँग्रेसने मुस्लिमांना विकासापासून कोसो दूर ठेवले.मुस्लिम समाजाचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला.याउलट मोदी सरकारने मुस्लिमांची शैक्षणिक आर्थिक सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी विकासभिमुख योजना राबविल्या. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून मुस्लिम समाज हा भाजपच्या पाठीमागे खंबीर उभा असल्याचे भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!