दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे वेध लागते. एकच वारी, 19 फेब्रुवारी असे आपण म्हणत असतो. याहीवर्षी संपूर्ण विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत!आहेत. त्यांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. म्हणून आजही त्यांच्या कार्याचे स्मरण करून प्रेरणा घेतली जाते आपली संस्कृती आणि धर्म जो टिकून आहे तो फक्त शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वामुळेच.
भोकरदन तालुक्यातील जवखेडा (बू) येथील शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व समस्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित्त शिवरायांच्या कार्याचे स्मरण करून त्यास उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
शालेय समितीचे अध्यक्ष अजिनाथ पवार,उपाध्यक्ष हरिभाऊ पवार,सदस्य- ज्ञानेश्वर पवार,राहुल पवार,कृष्णा पवार, अविनाश खरात, रामेश्वर विधाते,राजू बलरावत, जनार्दन कांबळे, शरद कांबळे, मुख्याध्यापक व शिक्षकांनी देखील शुभेच्छा दिल्या.
भाजपा ,जि. प.सर्कलथ प्रमुख गणेश पाटील पवार, भाजपा युवा नेते तथा,संत कोंडीबाबा कृषी सेवा केंद्र संचालक बाबासाहेब पाटील पवार यांनी देखील शिवजयंती निमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
सदैव रयतेच्या कल्याणासाठी झटणारा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.,हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.या शब्दात मान्यवरांनी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
