दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमुद्रा फाउंडेशन , गणपत दादा इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेस स्पर्धांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
सर्वप्रथम सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नंतर ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. स्पर्धकांनी माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,स्वामी विवेकानंद यांविषयी आपले विचार व्यक्त केले. दुपारच्या सत्रात बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,समूर्तीचिन्ह व रोख बक्षीस वितरण करण्यात आले.सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.
यास्पर्धेत तेजस्वी वरुळकर, गौरी दारुवले, अनुजा नागवे, दिपाली नागवे, भक्ती काकडे, भक्ती फुके,शिवानी बोकाडे, अश्विनी मस्के,मयुरी मगरे,वेदिका कदम,अश्विनी घायाळ, ऋतुजा शिरसाठ,कीर्ती भूमकर,पल्लवी नागवे, वैष्णवी कदम, संदीप हिवाळे,शुभांगी कदम,मनीषा शिंदे या स्पर्धकांनी बक्षिसे पटकावली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते समानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी सुधाकरराव दानवे ,भाऊसाहेब भुजंग , कैलास पुंगळे , रामेश्वर सोनुने , भाऊसाहेब काकडे , भगवानराव नागवे, ज्ञानेश्वर पुंगळे , सारंगधर बोडखे, पंढरीनाथ करपे , सुखानंद पारवे , रामेश्वर कढवणे,विनोद डवले , रामचंद्र नागवे , परमेश्वर पुंगळे,संदीप वरूळकर , भीमाशंकर दारुवाले , गणेश जगताप , सागर महाराज भोंडे, प्रभाकर ठोंबरे , अनिल पुंगळे, डॉ.ईश्वर जटाळे , भगवानराव पुंगळे , संतोष पुंगळे , प्रा.आसाराम बोटुळे, जगन वाघमोडे ,भगवान मुटकुळे,विजय पिंपळसे, सतीश आंबरे, अमोल बोडखे , राजू मिसाळ, संदीप सोनुने , मनसुख पिंपळे , विकास राठोड , जालिंदर पुंगळे, मुकुंद साबळे, अनंता मुळे, सदाशिव दारुवाले व संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
