दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

जालना: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार चनेगाव येथील उद्धव जायभाये यांची जालना जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे ,जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या हस्ते जायभाये यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

उद्धव जायभाये हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, आ. संतोष पाटील दानवे ,आ.नारायण कुचे ,जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भारतीय जनता पार्टीचे काम करत आले आहेत.आज त्यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे , घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिष घाटगे, राज्य कार्यकारिणी सदस्य रामेश्वर भांदरगे,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे ,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जगताप यांच्या उपस्थित जायभाये यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्यांच्या या निवडीबद्दल,शेषराव जायभाये,प्रेमनाथ सानप, गणेश मुटकुळे,पुंजाराम निहाळ,जिवन घुगे,विठ्ठल घुगे, कोंडीबा घुगे,प्रल्हाद जायभाये, शिवाजी तायडे परमेश्वर कायंदे, प्रल्हाद तायडे, पत्रकार दिपक घुगे, काकासाहेब निहाळ, रामेश्वर घुगे,रामदास काफरे,सदाशिव जायभाये, ज्ञानेश्वर मुटकुळे,कृष्णा मुटकुळे,संतोष शेळके, सुभाष मुटकुळे, कृष्णा बकाल व मित्र परिवाराच्या वतीने उद्धव जायभाये यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!