दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केले.त्यानिमित्ताने भाजपने महा-जनसंपर्क अभियानाला सुरवात केली आहे.मोदी सरकारची उपलब्धी सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे.त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन तालुक्यातील नळनी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार महा-जनसंपर्क अभियान बैठक संपन्न झाली.यावेळी ना.दानवेंनी कार्यकर्त्यांसह डबा पार्टीत सहभाग घेऊन स्नेहभोजनाचा आनंद लुटला.
भोकरदन तालुक्यात महा-जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नळणी बु.आणि राजुर जिल्हा परिषद गटाची बैठक केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली.याप्रसंगी भाजप जिल्हाध्य आ.संतोष दानवे,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.दानवें म्हणाले की मोदी सरकारच्या काळात अनेक जनकल्याणकारी योजनाच्या माध्यमातून विकासात्मक कामे पूर्ण झाली.पीएम आवास,उज्जवला गॅस,हर घर जल,किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत यासारख्या योजना निर्माण झाल्या.तसेच विमानतळ, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व राष्ट्रीय महामार्गाचा विकास होऊन पायाभूत सुविधा वेगाने निर्माण होत असल्याचे ना. दानवें यांनी सांगितले.त्यामुळेच मोदी सरकारच्या काळात भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.
महा-जनसंपर्क अभियानांतर्गत सामूहिक भोजन व डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ.संतोष पाटील दानवेंसह कार्यकर्त्यांनी आपापल्या घरून जेवणाचा डबा बनवून आणला होता.कार्यक्रम संपल्यावर केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवेंनी डबापार्टीत सहभाग नोंदवला. पंगतीत बसून कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला. या डबा पार्टीत भाजप जिल्हाध्य आ.संतोष पाटील दानवेंही सामील झाले होते.या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रामदास साबळे,शालिकराम जाधव, गणेश महाराज साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ.चंद्रकांत साबळे,माजी जि.प.सदस्य कमलाकर साबळ,मार्केट कमिटी चेअरमन मुकुंदराव मुगुटवार,राजूर सर्कलचे भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते जगनराव पवार,रामदास तळेकर,भगवानराव नागवे,माजी सभापती गजानन नागवे,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, गजानन नागवे, प्रल्हाद गाडेकर,ग्रा.पं.सदस्य पंढरीनाथ करपे,विनोद डवले,मुसा सौदागर,राहूल दरख,मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,बाळू मापारी,रतन ठोंबरे,अर्जुन मांगडे,कैलास जाधव यासह नळणी व राजुर गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
