दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी लढा उभा करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भोकरदन तालुक्यातील उंबरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव एकत्र जमले होते.शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी तरुणांनी मराठा आरक्षण मागण्याचा फलक व भगवे ध्वज हातात घेऊन जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात ग्रामस्थांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती.शिवानी फुके, साक्षी फुके,किरण होलगे या शाळकरी मुलींनी स्फूर्तिदायक भाषणे करून मराठा समाजातील समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी गावातील तरुणांनी तसेच बाहेरून आलेल्या मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.याकार्यक्रमास गजानन नागवे,भाऊसाहेब भुजंग, ज्ञानेश्वर पुंगळे,दिनकर थोटे,सुदाम ढवळे,आप्पासाहेब साखरे, आप्पासाहेब पुंगळे,पांडुरंग साखरे,नवनाथ फुके,करण फुके,संदीप फूके,दीपक होलगे,नंदु फुके,कृष्णा होलगे, विशाल होलगे, शुभम फुके,विलास फुके,कैलाश फुके, राजु होलगे,राजु पंडित,चंदु फुके,संजय फुके,भगवान फुके,सतिश देठे,संतोष फुके, गुलाबराव होलगे, दिलीप तोडकर,बळीराम फुके,प्रकाश फुके,प्रवीण होलगे,योगेश फुके यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!