दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा. बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पीजीची विद्यार्थिनी डॉ. मोमिता देवनाथ हिच्यावर काही गुंडांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले असून या घटनेच्या निषेधार्थ भोकरदन तालुक्यातील राजूर येथील डॉक्टर्स असोसिएशन,केमिस्ट असोसिएशन आणि लॅब असोसिएशन यांच्यावतीने राजूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांसमोरी चौकात तीव्र आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.यावेळी डॉ. मोमिता देवनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहण्यात आली. डॉक्टर मोमिता देवनाथच्या मारेकऱ्यांच्या विरुद्ध जलद खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केमिस्टचे भोकरदन तालुकाध्यक्ष शरद थोटे यांनी केली.एका तरुण महिला डॉक्टरांची निर्घृण हत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशी संतप्त भावना उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केली. डॉक्टर मोमितांच्या मारेकऱ्यांच्या विरोध जलद खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि केंद्रीय संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी राजूर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली .यावळी केमिस्ट तालुकाध्यक्ष शरद पाटील थोटे, डॉ. जटाळे, डॉ. मिरकर, डॉ. काबरा, डॉ.देशमुख,डॉ.कदम,डॉ. जाधव,डॉ. बनकर,डॉ.पवार,डॉ.कोल्हे,डॉ.वायाळ,डॉ.भंडारी,डॉ. शेख, मनोज काबरा,राहुल नागवे, सोमेश तवले,चंदू फुलसुंदर,दत्तू शिंदे,योगेश नागवे,उमेश भालेराव,प्रभात दरक यांच्यासह डॉक्टर व राजूर मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी -शरद थोटे

डॉ.मोमिता देवनाथ ह्या कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना अत्यंत निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी आहे. वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत.जलद खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. केंद्रीय संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी.

(शरद पाटील थोटे, केमिस्ट तालुकाध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!