दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: बांगलादेशातील हिंदूवरील अन्याय,अत्याचार त्वरित थांबून मानवाधिकारानुसार अल्पसंख्याक हिंदूंची मालमत्ता आणि जिवांचे संरक्षण करण्यात यावे यासाठी भोकरदन तालुक्यातील राजुर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने मोर्चा सामील झाले होते.
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात 10 नोव्हेंबर रोजी परमपूज्य खडेश्वरी बाबा व साधुसंतांच्या नेतृत्वात राजुर येथे छत्रपती संभाजी महाराज चौकातून मोर्चा काढुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.हातात भगवा ध्वज घेऊन मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव मोर्चात सामील झाले होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी बांगलादेश सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.बांगलादेशातील हिंदू साधुसंतावर अमानवीय अत्याचार होत असून हा मानवतेला लागलेला कलंक आहे अशी प्रतिक्रिया परमपूज्य खडेश्वरी बाबा यांनी दिली. मागील काही दिवसापासून बांगलादेशातील हिंदूंची दयनीय अवस्था झाली असून त्यांच्यावर होत असलेले सामूहिक अत्याचार त्वरित थांबवावे असे मत शिवाजीराव थोटे यांनी व्यक्त केले.तर बांगलादेशातील निर्लज्ज सरकार जाणून बुजून अल्पसंख्यांक हिंदूवर अत्याचार करत असल्याचा आरोप कैलास पुंगळे यांनी केला.कार्यक्रमाच्या शेवटी तलाठ्यांच्या मार्फत भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी हसनाबद पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी भाऊसाहेब भुजंग, राहुल दरख, मुकेश अग्रवाल, रतन ठोंबरे,भगवान नागवे, सारंगधर बोडके, रामेश्वर सोनवणे, नामदेव बोराडे, नारायण पवार, गजानन नागवे, आकाश पुंगळे,नवनाथ फुके, विनोद पुंगळे ,राजू होलगे, विनोद फुके, पंढरीनाथ करपे, मनोज साबळे, सचिन फटाले,जालिंदर पुंगळे, प्रल्हाद निलख,विकास राठोड,निलेश जामदार,साहेबराव ठोंबरे, योगेश मोहिते, दत्ता वनारसे, हरिभाऊ दानवे,अंकुश शेजुळ, बजरंग अग्रवाल, निवृत्ती नागवे यांच्यासह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण व्हावे,हिंदू धर्माचार्यांची सुटका करावी,हिंदू महिलांवरील अत्याचार त्वरित थांबवावेत, अल्पसंख्यांक हिंदू मानवाधिकाराचे संरक्षण व्हावे,हिंदूंची मालमत्ता व त्यांच्या जीवांचे संरक्षण व्हावे या मागण्यासह प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
