दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांची 30 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा सुरू झाली असून या दरम्यान ते मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 10 ऑक्टोबर रोजी राजूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार रथ तयार करण्यात आला असून राजुरेश्वराच्या पायथ्याशी श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून रथाचे पूजन करून जनजागृतीस प्रारंभ करण्यात आला.
या प्रचार रथाच्या माध्यमातून परिसरातील गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा रथ आकर्षक पध्दतीने सजवला असून त्यावर लाऊडस्पीकर बसवले आहे.या प्रचार रथामार्फत गावोगावी जाऊन मराठा समाजबांधवांत जनजागृती केली जाणार आहे.
प्रचार रथासोबतच मराठा समन्वयक गावोगावी जाऊन बैठका घेतल्या जाणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर सभेसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. प्रचार रथाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे याचे महत्व पटवून सांगितले जाणार आहे.सभा होईपर्यंत हा रथ गावोगावी फिरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचा प्रचार होऊन जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे म्हणून हा रथ तयार करण्यात आला आहे. आज सकाळी राजुरेश्वराच्या पायथ्याशी पूजन करून रथाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी सकल मराठा समाज बांधवं उपस्थित होते.
