दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा. बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी तपोवन येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी नागवे यांना निवेदन देण्यात आले.मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तपोवन येथे हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.यावेळी सचिन फटाले यांनी ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.आरक्षणाच्या समर्थनार्थ युवकांनी तपोवन ते राजूर मोटारसायकल रॅली काढली होती.आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार तपोवन येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.यावेळी ज्ञानेश्वर पुंगळे,सुखानंद पारवे ,रामेश्वर कढवणे , प्रभू कढवणे, राजेंद्र कढवणे ,किशोर कढवणे, ओंकार कढवणे,प्रदीप ताठे,सुरेश कढवणे, योगेश कढवणे, भाऊसाहेब जगदाळे, आप्पासाहेब कढवणे, बाबासाहेब जगदाळे, परमेश्वर  कढवणे, सदाशिव पारवे, तुकाराम पारवे, जनार्दन बनकर, ज्ञानेश्वर मालुसरे, दीपक कढवणे, बळीराम मालुसरे, सखाराम मालुसरे,संतोष मालुसरे, गजानन पारवे यासह मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!