दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येथे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करत ठिय्या आंदोल सुरु करण्यात आले आहे.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनास सुरुवात झाली.यावेळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासारख्या मागण्या करण्यात आल्या.जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवरांनी या आंदोलनास भेटी दिल्या. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनाही निवेदन देण्यात आले .
यावेळी माजी सभापती गजानन नागवे, जगनबाबा पवार, रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले, मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,राजुर अर्बनचे अध्यक्ष कैलास आप्पा गबाळे,भगवान ठोंबरे ,अनिल पुंगळे, नामदेव पुंगळे, ग्रा.सदस्य निवृत्ती पुंगळे,स्वराज्य संघटनेचे विनोद पुंगळे,शेवाळे सर ,आकाश पुंगळे,नितीन पुंगळे, मुकुंद जुंबड,अमोल पवार,दिनेश महाराज शेजुळ,उमेश पुंगळे द्वारकाधीश पुंगळे,मनोज कुमकर, दत्ता घायाळ, अरुण कदम यासह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
