दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर :पासून जवळ असलेल्या नळणी केंद्रातील समर्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने गेब्ज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  एक मूल, एक झाड हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला.

समर्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस गेब्ज संस्थेच्या वतीने 50 रोपे मिळाली होती.शाळेच्या आवारात एक मूल,एक झाड या संकल्पने प्रमाणे प्रत्येक मुलास एक झाड लावण्यास देऊन त्या झाडांना मुलांची नावे देण्यात आली.यामुळे मुलांमध्ये वृक्षाबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण होऊन झाडे वाढीस लावण्याची भावना निर्माण होत असल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.दुपारच्या सुट्टीत जेवणाआधी आणि नंतर मुलं झाडाच्या बुंध्याशी हात धुवून झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या या कृतीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.मुलांना स्वतःचे हक्काचे झाड मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.आपले झाड वाढीस लागावे म्हणून विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक विधायक स्पर्धा निर्माण झाली आहे.आपले झाड वाढीस लागावे म्हणून विद्यार्थी झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शाळेतील शिक्षही मुलांना प्रोत्साहन देऊन वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत आहे.गेब्ज संस्थेच्या माध्यमातून बरंजळा साबळे व नळणी केंद्रातील 31 शाळांना सहा हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोरेल यांनी झाडांसाठी मोफत ड्रीप देण्याचे कबूल केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक आप्पासाहेब साबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य ,संस्थेचे प्रतिनिधी दिपक ओढेकर,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!