दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: दरवर्षी 24 सप्टेंबर हा जागतिक कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पालक आणि मुलींच्या नात्यातील समर्पित भावना टिकून राहावी व समाजात मुलींना समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.भोकरदन तालुक्यातील राजूर येथे माजी सभापती भाऊसाहेब काकडे यांच्या पुढाकारातून एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या यशस्वी मुलींचा सत्कार करून जागतिक कन्या दिन उत्साह साजरा करण्यात आला.2023 मध्ये झालेल्या नीट परीक्षेची नुकतीच निवड यादी जाहीर झाली असून त्यामध्ये स्नेहल रामकृष्ण पारवे, गायत्री लक्ष्मीकांत टाकळकर,वैष्णवी संदीप पडोळ , गणेश भीमराव माने आदींची एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे.जागतिक कन्या दिनानिमित्त यशस्वी मुलींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव थोटे, माजी सभापती गजानन नागवे,भाऊसाहेब काकडे ,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,उपसरपंच विनोद डवले, व्यापारी संघाचे अध्यक्ष सारंगधर बोडके,विठ्ठलराव टेपले, केंद्रप्रमुख रमेश राऊत,शिवाजी बांदल,प्रा.आसाराम बोटुळे,पत्रकार राम पारवे,प्रा.बाळासाहेब बोराडे,संदीप पडोळ,भीमराव माने,लक्ष्मीकांत टाकळकर,सय्यद रफिक आदींच्या हस्ते मुलींचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद रफिक यांनी केले तर मा.सभापती भाऊसाहेब काकडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!