दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

जालना: बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे श्री शिवाजी विद्यालयामध्ये एक दिवशी गणितीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतून गणिततज्ञ तथा नळणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक हरी निकम यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत गणित हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.नवनवीन क्लुप्त्या वापरून गणित विषयाचे अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होते असे मत गणिततज्ञ हरी निकम यांनी व्यक्त केले.याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव निकम,प्रमुख पाहुणे एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी गोपीनाथराव खरात,संस्थेचे जेष्ठ सदस्य गणेशराव भेरे, प्रमुख मार्गदर्शक हरी निकम,चंदनसेठ गोलेच्छा,प्राचार्य प्रवीण निकम,पर्यवेक्षक बि.आर.गायकवाड आदीजन उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक एच.व्ही.निकम यांनी गणिती कार्यशाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने गणितीय सिद्धांत समजावून सांगितले.खडू,फळा मुक्त गणित कसे शिकवले जाऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. जे.एडके यांनी केले तर आभार प्रा. एस.जी.मिश्रा यांनी केले.

गणित विषयाची भीती दूर होण्यास मदत होते-हरी निकम (गणिततज्ञ)गणितीय कार्यशाळेतून उद्देशपूर्ण आणि कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला जातो.हा एक सामाजिक उपक्रम आहे.शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले जाते.खडू फळा मुक्त गणित ही संकल्पना राबवली जाते.गणितीय संबोध, सकल्पना,प्रमेय सिद्धांत हे पडताळा करून दाखवतो. त्यामुळे गणितांविषयीची भिती दूर होण्यास मदत होते असे मत हरी निकम यांनी व्यक्त केले.

गणित कसे सोडवायचे हे तंत्र अवगत झाले-भक्ती धनेधर, (विद्यार्थिनी)गणितीय कार्यशाळेतून कमीत कमी वेळेत गणित कसे सोडवायचे हे तंत्र अवगत झाले.गणितामधील नवंनवीन पद्धतीची ओळख झाली.निकम सरांनी सोप्या पध्दतीने गणित समजावून सांगितले. त्यामुळे गणिताविषयीची भीती दूर झाली.अशी प्रतिक्रिया भक्ती धनेधर या विद्यार्थिनीने दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!