दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील राजूर येथील स्नेहल पारवे आणि गायत्री टाकळकर या विद्यार्थिनींनी 2023मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत उत्तम गुण संपादित करून घवघवीत यश मिळवले आहे.
नुकतीच मेडिकलची निवड यादी जाहीर झाली असून त्यामध्ये स्नेहल पारवे आणि गायत्री टाकळकर या दोघीही एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.
त्यांबद्दल राजूर येथे मित्रपरिवाराच्या वतीने स्नेहल पारवे आणि गायत्री टाकळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात.ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीज म्हणजेच राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे दरवर्षी घेतली जाते.
स्नेहल रामकृष्ण पारवे हिस एमबीबीएस साठी रायगड जिल्ह्यातील डॉ.एन. वाय. तासगावकर मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तर गायत्री लक्ष्मीकांत टाकळकर हिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे प्रवेश निश्चित झाला आहे.
स्नेहल पारवे आणि गायत्री टाकळकर या मुलींनी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन या परीक्षेत यश मिळवले आहे. याही परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसून आले.
स्नेहल पारवे आणि गायत्री टाकळकर यांची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली म्हणून मित्रपरिवाराच्या वतीने वतीने सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजुरचे सरपंच प्रतिभा भुजंग,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,माजी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे,ज्येष्ठ शिक्षक पिंपळे सर,प्रा.बाळासाहेब बोराडे,हरी निकम,विनोदकुमार पांडे,शिवाजी बांदल डॉ.ईश्वर जटाळे पत्रकार राम पारवे,दीपक पारवे ,विष्णू गवळी ,संदीप सोनवणे,दिनेश महाराज शेजुळ,लक्ष्मीकांत टाकळकर, राजू भुमकर,अभिषेक टाकळकर अतुल पुंगळे,अभिषेक पारवे आदीजन उपस्थित होते.
