दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

जालना :परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दिव्या गजानन मूळे हिने नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुण संपादन करून घवघवीत यश मिळवून नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्यानिमित्त परतूर येथे मराठ सेवा संघाच्या वतीने दिव्या मुळे हिचा शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा शोध घेऊ त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा नवोदय परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.या परीक्षेबाबत आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने जिल्हा भरातून हजारो विद्यार्थी परीक्षेत बसत असतात.दिव्या मुळे हिने या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.परतुर तालुक्यातील आंबा येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी ती पात्र ठरलीआहे. त्याबद्दल परतूर येथे मराठा सेवा संघाच्या वतीने दिव्या मुळे हिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.यावेळी रिलॅबल अकॅडमीचे संचालक धनंजय आकात, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रोहित देशमुख,कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे,वैद्यकीय अधिकारी डॉ.नवल साहेब,गजानन मुळे, सीमा मुळे, लक्ष्मण बोराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्या मुळेचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!