दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप केले जाते.या माध्यमातून शासन स्तरावर जागृती केली जात आहे. यामध्ये शैक्षणिक संस्थाही पुढाकार घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजूर येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना ३८ सायकलीचे वाटप करण्यात आले.
मोरेश्वर विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनी ह्या परिसरातील खेड्यावरून शिक्षणासाठी येतात. वेळेवर वाहन उपलब्ध होत नसल्याने मुलींना शाळेत जायला अडचणी येत असत.काही मुलींच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता होती.परंतु मानव विकास योजना आणि संस्थेच्या पुढाकारातुन शाळेपासून अंतरावर राहणार्या ग्रामीण भागातील ३८ गरजू मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या.सायकली मिळाल्या बद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी हसनाबद पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे,भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव थोटे, शासकीय गुत्तेदार सुधाकरराव दानवे, शोभाताई मतकर, सरपंच प्रतिभाताई भुजंग,उपसरपंच जिजाबाई मगरे,योगीताताई दानवे,सुशीलाबाई भुजंग, भगवान नागवे,जि.प.सदस्य कैलास पुंगळे,माजी जि.प. सदस्य रामेश्वर सोनुने,मा.सभापती भाऊसाहेब काकडे, गणपती संस्थान व्यवस्थापक गणेशराव साबळे,पत्रकार श्यामराव पुंगळे,शिवाजी बोर्डे,श्रीरामपंच पुंगळे,ग्राम पंचायत सदस्य मुसा सौदागर,पंढरीनाथ करपे, संतोष मगरे,परमेश्वर पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, गुलाबराव मगरे, अल्पसंख्याक आघाडीचे मज्जिदभाई,विष्णू राज्यकर,रतन ठोंबरे, रामेश्वर टोम्पे, रमेश सोनवणे,लहू शेजुळ ,यादव मोरे,मेस्टा अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,पंडित पुंगळे, अविनाश थोटे,प्राचार्य संतोष सोनुने,पर्यवेक्षक संतोष इंगळे, मार्गदर्शक सुनील दानवे, प्राचार्य किरड आदी मान्यवरांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
