दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप( उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा)परीक्षेची सन २०२३ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चांदई एक्को येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी गौरी समाधान ढाकणे या विद्यार्थिनी ७४% टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच शाळेतील इतर नऊ विद्यार्थीही गुणवत्ता यादीत झळकले आहेत.यामध्ये मयुरी गिरी,कल्याणी मुळे,कीर्ती पवार, कोमल वाघमारे,आयशा मदार,निखिल गंगावणे ,अंकुश ढाकणे ,सौरभ ढाकणे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल भोकरदन पं.स.चे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर,सरपंच रामदास तळेकर,उपसरपंच विष्णू मोरे, केंद्रप्रमुख अण्णा इंगळे, केंद्रीय मुख्याध्यापक पी.पी.पालोदे,पोलिस पाटील दादाराव पवार,जगनराव पवार,रामदास तळेकर,बाबासाहेब ढाकणे,रघुनाथ ढाकणे,भगवान ढाकणे,अनिल वरकड, भरत थोरात,जगदेव घुगे,विजय साळवे,भगवान लहाने , महानंदा डोके,कल्पना जगताप आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!