दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:पासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदई टेपली येथील शाळेत इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीपरीक्षेत उत्तीर्ण झालेअसून त्या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.तसेच शाळेतील बदली शिक्षकांचा निरोप समारंभ चांधई टेपले येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला. शिष्यवृत्ती परीक्षेत अमर शेळके,आदित्य शेळके, किर्ती टेपले,गौरव कळसकर,सायली घोरपडे ,राम टेपले, पायल घोरपडे,अस्मिता घोरपडे,कोमल घोरपडे,रितेश बनसोडे, नम्रता घोरपडे,ओम मराठे,किर्ती घोरपडे आदी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.त्याबद्दल भोकरदन पं.समितीचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रप्रमुख अण्णा इंगळे यांनी प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांविषयी गौरवोद्गार काढले.तर अनिल वरकड यांनी विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे असे मत व्यक्त केले.भीमराव घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून शाळा व गावाचे नाव रोशन करावे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी शाळेतून बदली झालेले शिक्षक महादेव वैद्य,प्रविण कुलट,अभिजित बंगाळे,आण्णा गटकाळ यांचा शालेय व्यावस्थापन समिती व ग्रामस्थांकडू सत्कार करण्यात आला. यावेळी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांस शालेय साहित्य बक्षीस म्हणून भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच भरत टेपले,उपसरपंच भीमराव घोरपडे,शालेय समिती अध्यक्ष गणेशराव टेपले, तंटा मुक्ती उपाध्यक्ष मनोहर घोरपडे, केंदीय मुख्याध्यापक प्रल्हाद पालोदे ,माधव गंदपवाड,रामेश्वर चंदनकर,अनिल वरकड, राम राऊत, यांच्यासह शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व पालक यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णा इंगळे,सुत्रसंचलन सचिन अक्कर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन शिंगणे, प्रशांत पिसे, विकास मोरे ,मनीषा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
