दर्पण सह्याद्री न्यूज
राजूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप( पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) सन २०२३ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये भोकरदन तालुक्यातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी रेणुका सुधाकर घोरपडे शिष्यवृत्ती परीक्षेत ८४.६६ टक्के गुण घेऊन भोकरदन तालुक्यात सातवा क्रमांक व जिल्ह्यात दहवा क्रमांक मिळवला आहे.
तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख अण्णा इंगळे, केंद्रीय मुख्याध्यापक पी.पी. पालोदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक जावळे,अनिल वरकड, गजानन लहाने शाळेचे मुख्याध्यापक आर.एच.दानवे, आदींच्या हस्ते रेणुका घोरपडे हिस गौरविण्यात आले.यावेळी अरुण जावळे,वंदना राऊत, पंचफुला जावळे, उषा जावळे यांची उपस्थिती होती.
