दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर : येथुन जवळच असलेले चनेगाव येथील शालेय व्यवस्थापक समितीची निवड करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेत मतदान पद्धतीने निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष सुवर्णा घुगे तर उपाध्यक्षपदी असराबाई शेळके, तर अंबादास किसन पवार,नंदा बाळू तायडे,सरलाबाई शिवाजी निहाळ, यांची सर्व पालकामधुन निवड करण्यात आली.
चनेगाव येथील सरपंच निवृत्ती महाराज शेवाळे व उद्धव आबा जायभाये यांच्या नेतृत्वाखाली सर्व समितीची निवड करण्यात आली यामध्ये चनेगावचे माजी सरपंच उद्धव आबा जायभाये यांचे वर्चस्व सिद्ध झाले. मतदान पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष सुवर्णा जीवन घुगे तर उपाध्यक्षपदी असराबाई कृष्णा शेळके यांच्या निवडीसाठी उद्धव आबा जायभाये यांनी विशेष प्रयत्न केले होते.
यावेळी प्रेमनाथ मामा सानप,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष पुंजाराम भाऊ निहाळ,गणेश मुटकुळे, विठ्ठल घुगे,कृष्णा शेळके,गणपत बकाल,विठ्ठल तोतरे, उद्धव निहाळ,शुभान शेख,विलास मुटकुळे,शिवाजी तायडे, प्रमेश्वर कायंदे, दौलतराव निहाळ,देविदास जायभाये, सदाशिव जायभाये, दशरथ तायडे,सिताराम तायडे,प्रल्हाद तायडे,गजानन निहाळ, राजू जायभाये,सुभाष भाऊ मुटकुळे,संजय निहाळ,समाधान मुटकुळे,सोमिनाथ निहाळ,मंथा निहाळ,बद्री निहाळ,कोंडीराम घुगे,राजू घुगे, दिपक जायभाये,मुजीब शेख,सुभाष घुगे, काकासाहेब निहाळ,माधव जायभाये,दत्ताभाऊ घुगे,अशोक घुगे,रामू काफरे,संजय जायभाये यांच्या सह शाळेय मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक वर्ग आदी उपस्थित होते.
