दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील राजूर येथील लिटल स्टार प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिध्दार्थ उद्यान,पाणचक्की,बीबीचा मकबरा,वेरूळच्या लेण्या,भद्रा मारोती यासारख्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटला.
या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी उद्यानातील विविध प्राण्यांचे निरक्षण करून त्यांची ओळख करून घेतली. चिमुकल्यांनी पहिल्यांदाच मत्सालय,ससा,हत्ती, मगर, वाघ, सिंह यांसारखे प्राणी प्रथमच पाहिल्याने त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते.वस्तू संग्रहालय व ऐतिहासिक वास्तूं संदर्भात जाणून घेतले.उद्यानातील खेळणी तसेच झुकझुक गाडीचाही मनमुराद आनंद लुटला.
पाणचक्की, बीबीचा मुकबरा,देवगिरी किल्ला,वेरूळची लेणी याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आढे, शिक्षिका गीता घुगे,वैशाली कायदे,रेश्मा शेख यांनी सहलीचे उत्तम नियोजन केले होते.सहलीसाठी पालकांनीही योग्य ते सहकार्य केले.
