दर्पण सह्याद्री न्यूज

भोकरदन: सध्याच्या स्पर्धेच्या युगातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक पालक आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने आधुनिक शिक्षणाची कास धरत आहे. परंतु बालकांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आधुनिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थीदशेत बालमनावर नैतिक मूल्यसंस्कार रुजवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी केले. भोकरदन येथील किड्स प्लॅनेट इंटरनॅशनल स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.बाळासाहेब बोराडे, बालाजी पतसंस्थेचे सचिव मदन सर,लिपिक-सोन्नी सर,गणेश आफसेटचे संचालक गणेश सहाने पाटील,संत गजानन हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रशांत बावस्कर,पोलीस कर्मचारी समाधान जगताप, भिंगारे सर, आमदार संतोष पाटील दानवे यांचे स्वीय सहाय्यक शांताराम गव्हाणे,अनिल सोनुने,उमेश दळवी, विलास जाधव, सचिन चोरमारे, पंचायत समिती लिपिक योगेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.     

पुढे बोलताना प्रा.बोराडे म्हणाले की, मुलांमधील चांगल्या गुणांचे कौतुक व्हायला हवे.मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक समस्या निर्माण होताहेत.मुलांना यापासून वेळीच रोखायला पाहिजे. फास्टफूडच्या बदल्यात सकस आहार दिल्यास बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. प्रेरणादायी गोष्टीतून नैतिक मूल्यांची जोपासना होत असते.अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचे मन,मनगट आणि मस्तक मजबूत राहिले तरच तो भविष्याचा सामना करू शकेल असेही प्रा.बोराडे म्हणाले.यावेळी शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक क्रिडा स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम, द्वितीय,  तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.याकार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला बनकर, शिक्षीका कोमल तराळ ,रविता लुटे,शितल कुदर, निर्मळ ताई तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!