दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: पासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदई टेपली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून लोकगीत ,लावणी, भारूड,गोंधळ,भक्ती गीते,चुटकुले,उखाने,लघुनाटिका , हिंदी व मराठी चित्रपट गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राजीव टेपले, उपसरपंच भिमराव दादा घोरपडे, केंद्रप्रमुख आण्णा इंगळे,शालेय समिती अध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष भगवान धसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात आण्णा इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी अभिनय क्षेत्रात भरारी घ्यावी,प्रगती करून नावलौकिक मिळवावा असे नमुद केले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमातून सामाजिक, प्रबोधनात्मक विषयातून उत्कृष्ट जनजागृती करण्याचे काम शाळेच्या सर्व बालकलाकारांनी केले.त्याबद्दल उपस्थितांनी विद्यार्थी व शाळेचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याधापक आण्णा इंगळे,सचिन अक्कर,मनिषा सोणवने, सतिश शिरसाठ, कांता पुंगळे,प्रशांत पिसे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गणेश टेपले, दादासाहेब घोरपडे,राम राऊत, विकास मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी,युवक, बचत गटाच्या महीला,ग्रामस्थ ,पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन अक्कर ,वेशभुषा मनिषा सोणवने,स्वाती घोरपडे यांनी तर नियोजन सतीश शिरसाठ यांनी केले.
