दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील राजूर येथील मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयचा एकूण निकाल 99.66% लागला असून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या परीक्षेस महाविद्यालयातून कला व विज्ञान शाखा मिळून एकूण 297 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 296 विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 99.34% इतका लागला आहे. विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सूर्यवंशी प्रणव रविंद्र 88.17(प्रथम), मालुसरे पल्लवी श्रीमंत 87.83%(द्वितीय), सोनुने आर्यन संतोष 86.50 % (तृतीय) तर कला शाखेमधून टोम्पे वैष्णवी नाना 82.67% (प्रथम), म्हसरूप संगीता उत्तम 81.50 % द्वितीय),चव्हाण कोमल कैलास 81.50 (द्वितीय), राउत पूजा विष्णु 81.17% तृतीय) क्रमांक पटकावला आहे.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव नामदार रावसाहेब पाटील दानवे, अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई दानवे, कोषाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
