दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
येथे दिनांक 30 मार्च रोजी प्रभू श्रीराम जयंती निमित्त भव्य शोभयात्रे दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये गावातील आबालवृध्दांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता.जय श्रीराम,छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.महिला व पुरुषांनी भारतीय वेशभूषा परिधान करून डोक्यावर भगवे फेटे बांधले होते.राजूर येथील रामभक्तांनी व्यवस्थितरीत्या नियोजन केल्यामुळे राजूर येथील रुद्राणी फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले यांच्या संकल्पनेतून सर्व तरुणांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी आपण पाहिले की देशासह राज्यात अनेक ठिकाणी रामनवमी उत्सवाला गालबोट लागले.काही ठिकाणी समाज कंटकांनी खाजगी तसेच सार्वजनिक वाहनांचे नुकसानही केल्याचे दिसून आले.परंतु श्रीक्षेत्र राजूर येथे रामनवमी निमित्त काढण्यात आलेली शोभा यात्रा शांततेत पार पडली.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्रीराम नवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी राम रथाच्या प्रभू श्रीराम यांची प्रतिमा ठेवली होती. महिलांनी दारोदारी भव्य अशा रांगोळी काढून प्रभू रामचंद्र यांच्या रथाचे स्वागत केले.श्रीराम यांच्या प्रतिमेला ओवाळून महिलांनी मनोभावे पूजा करून दर्शन घेतले होते.
राजूर येथील रामनवमी उत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वांना हा उत्सव आपलासा वाटत होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या शोभा यात्रेचा समारोप रात्री दहाच्या सुमारास श्री राजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी महाआरतीने झाला.
भीमाशंकर आप्पा दारुवाले यांच्या संकल्पेतून रामभक्तांचा सत्कार
रामनवमी उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल राजूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा रुद्राणी फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले यांच्या संकल्पनेतून रामभक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंकुश पुंगळे,रामेश्वर पुंगळे, आशुतोष दारुवाले,निलेश जामदार,बजरंग कोमटे, दिपक भूमकर, अभिषेक गुळवे,प्रथमेश जैस्वाल,भरत गबाळे,कृष्णा जैस्वाल,बजरंग अग्रवाल,योगेश वराडे,लक्ष्मण बोर्डे, कृष्णा गायकवाड, हर्षल पुंगळे, दिपक हिंगमीरे, शुभम अग्रवाल, स्वप्नील कोमटे,रोहित शेठीया द्वारकाधीश पुंगळे,विशाल शेटे यासह अनेक रामभक्तांचा शाल व पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अंधार होता.तरुणांनी वेळोवेळी हा विषय ग्रामसभेत मांडला.
ग्रामपंचायतने सकारात्मक प्रतिसाद देत हायमास्ट दिव्याचे लोकार्पण केले त्यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साह दिसत होता. गावातील युवकांनी विधायक कार्यात सहभाग घेतल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते युवकांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे, रुद्राणी फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर दारुवले,राजुरी अर्बनचे कैलास गबाळे,सुनील पुंगळे,आकाश पुंगळे संदीप मगरे,रहीम शेख,अन्नू शहा ,अमोल पवार, भगवान पुंगळे, अनिल पुंगळे, संदीप दारुवाले,विठ्ठल पुंगळे,पांडुरंग इंगळे, प्रकाश पुंगळे यासह अनेकजण उपस्थित होते.
