दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजूर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात एकूण ४६ युवकांनी रक्तदान केले. त्याच बरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वातीताई जैस्वाल यांनी रक्तदान करून महिलांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनकरून वीजबिल भरणा केंद्राचे अनावरण करण्यात आले.यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, जिल्हा व्यापारी संघाचे जगन्नाथ थोटे,श्री झगरे गुरुजी,राजूर व्यापारी संघाचे अध्यक्ष राम पारवे,मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, प्रा.बाळासाहेब बोराडे,विभागीय व्यवस्थापक किरण बोर्डे,लेखा विभाग प्रमुख मंगेश भोंडे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पुंगळे, राहुल दरख ,परमेश्वर पुंगळे , प्रसिद्ध व्यावसायिक रामेश्वर कढवणे, डॉ.काबरा,विठ्ठलराव पुंगळे, चेतन अग्रवाल,शाखा व्यवस्थापक गजानन लहाने, अंकुश काळे,विश्वंभर ढाकणे,संतोष साबळे सिद्धेश्वर थोटे,प्राचार्य सुनील दानवे,अमोल दानवे,राजेंद्र जैस्वाल,चंद्रकांत चौतमल, सतीश ढाकणे,गणेश तायडे नंदकिशोर साखरे,अमोल पवार, भागवत खंडागळे,सचिन ठाकूर यासह अनेक जण उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाऊंडेशन आणि स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या वतीने रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.राजर्षी शाहू महाराज सोशल फाऊंडेशनच्या वतीने जवळपास ७५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.यामाध्यमातून दोन हजार बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ४९ शिबिरे संपन्न झाली असून याद्वारे जवळपास १८८५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल झगरे गुरुजी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या शिबिरात अंकुश काळे,सिद्धेश्वर थोटे,समाधान ठोंबरे, कृष्णा मराठे, राजीव जैस्वाल, उमेश नागरे,स्वाती जैस्वाल यासह ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रघुनाथ कड,किशोर शेजुळ,यांच्यासह राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
