दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:येथे ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
सर्वप्रथम मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवर भाजपा नेते शिवाजीराव थोटे,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकरराव दानवे,भगवानराव नागवे,सरपंच प्रतिभाताई भुजंग, योगिताताई दानवे,उपसरपंच जिजाबाई मगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,गणेश मामा साबळे,गौरखनाथ कुमकर,प्रा.बाळासाहेब बोराडे,ग्रामसेवक प्रमोद पुंगळे,जि.प.माजी सदस्य रामेश्वर सोनुने,बाळूभाऊ मापारी,व्यापारी संघाचे अध्यक्ष राम पारवे,पत्रकार शिवाजी बोर्डे,ग्रामपंचायत सदस्य मुसा सौदागर,श्रीरामपंच पुंगळे,विनोद डवले, आप्पासाहेब पुंगळे, राहुल दरख,संतोष मगरे,निवृत्ती पुंगळे, सुरेश पवार,पंढरीनाथ करपे,परमेश्वर पुंगळे सुनंदा पवार,जिजाबाई करपे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भुजंग यांनी केले.यावेळी बोलताना भुजंग म्हणाले की शिवप्रेमी तरुणांच्या मागणी नुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हायमॅक्स दिव्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.
यानंतर शिवाजीराव थोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.तर प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक,विचारवंत, समाजसुधारकांचे प्रेरणास्थान कसे होते हे पटवून दिले.
शाळकरी मुलांच्या ओघवत्या भाषणांने ग्रामस्थांची मने जिंकली.शिक्षिका सीमा सहाणे यांनी विद्यार्थ्यांकडून किल्ल्यांची प्रतिकृती, वेशभूषा आणि भाषणांची तयारी करून घेतली होती.ग्रामपंचायतच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ, जय शिवराय, अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास यावेळी कार्यक्रमास एकनाथ महाराज शिंदे,मुख्याध्यापक एकनाथ बाहेकर,शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पुंगळे,अनिल पुंगळे,सतुकाका पुंगळे, रामेश्वर टोम्पे, गुलाबराव मगरे,भाऊसाहेब भोसले,बबन गुळवे,प्रभाकर पवार,डॉ.ईश्वर जटाळे,रतन ठोंबरे,शुभम इंगेवार,शरद पिंपळे,अनिल साबळे,रमेश सोनवणे,जालिंदर पुंगळे,आशुतोष दारुवाले,ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश सोनवणे,भगवान सुद्रिक,विजय पुंगळे,सोमीनाथ पुंगळे,गजानन डवले,सिकंदर शेख,तसेच ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यासह अनेक शिवभक्तमोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर टोम्पे,तर आभार प्रदर्शन रामेश्वर सोनुने यांनी केले.
छत्रपती शिवरायांचे भव्य शिवस्मारक उभारण्यात यावे-प्रा.बोराडे
श्रीक्षेत्र राजुर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रयत्न आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तीर्थक्षेत्राचा विकास होत आहे.इथे भाविक व विद्यार्थी सहलींची नेहमीच वर्दळ असते. स्मारकाच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याचा जीवनपट,गडकिल्ल्यांची माहिती, शिवकालीन युद्धकला,गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीला शिवकार्यातून राष्ट्रकार्य करण्याची प्रेरणा मिळेल.म्हणून श्रीक्षेत्र राजूर येथे ग्रामपंचायतने भव्य शिवस्मारक उभारावे असे मत शिवजयंती उत्सवात प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी व्यक्त केले.
