दर्पण सह्याद्री न्यूज
जालना-भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथील तरुण जनार्धन अण्णासाहेब ढवळे(२५) ह्या तरुणाचा जुलै 2022 च्या रात्री जालन्याहून राजूरकडे येत असताना तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी अपघातात डोक्याला मार लागून उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता.घरातील कर्ता आणि तरुण मुलगा अचानक सोडून गेल्याने जनार्धन ढवळेच्या आई-वडिलांना फार मोठा धक्का बसला होता.
परंतु जनार्धन ढवळे यांनी आपल्या व्यवसायातील बचतीतून व भविष्यातील दुरदृष्टिकोणातून राजूर अर्बन बँकेमध्ये अपघात विमा काढलेला होता.आज कै. जनार्धन ढवळेच्या वारस म्हणून त्यांच्या आई सौ.सुमणबाई व वडील श्री.आण्णासाहेब ढवळे यांच्याकडे राजूर अर्बन बँकने एक लाख आठ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी राजूर अर्बनचे संस्थापक कैलास गबाळे,अध्यक्ष भीमाशंकर दारुवाले,व्यवस्थापक संग्राम पाटील,पांडुरंग इंगळे,संदीप मगरे यांसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
