दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजूर येथे थाईलॅंड येथील भंते खेमसिंग यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.याप्रसंगी भंते खेमसिंग यांचा समाज बांधवांच्या वतीनं भव्य असा सत्कार करण्यात आला.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तिचे काम पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले वत्यानंतर सामुहिक वंदनाही घेण्यात आली.याप्रसंगी भंते खेमसिंह यांचा भदंत सारिपुत्र महाथेरो,भंते अश्वजित (बुद्धगया) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भदंत सारिपुत्र महाथेरो,माजी सभापती सुदामराव सदाशिवे,पंढरीनाथ करपे,जगनराव पवार ,सचिन गंगावणे, गुलाबराव मगरे,भास्कर साळवे,संतोष मगरे,रमेश राऊत, श्रीमंता बोर्डे,अशोक मगरे,संजय मगरे,संतोष बोर्डे,मोकिंदा मगरे, प्रा.देवानंद पवार,आदमाने सर,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे,दादाराव मगरे,राजू मगरे,कृष्णा मगरे,दिपक सोनवणे, संदीप पवार,देवानंद इंगळे,मनोज जाधव, दिपक दाभाडे, मिलिद मगरे, अनिल जाधव यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गजानन इंगळे यांनी केले तर प्रास्तविक व आभार मुख्याध्यापक रमेरा राऊत यांनी मानले.
