दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर:केंद्रातील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर गणपत झगरे यांना यावर्षीचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजूर केंद्र आणि ग्रामपंचायत उमरखेडा यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.भोकरदन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर झगरे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी केंद्रप्रमुख रमेश पुंगळे,विठ्ठल घायाळ,के.डी.वाघ, कढवणे, सरपंच सोनाली होलगे,अध्यक्ष अनुसया विलास फुके,मुख्याध्यापक दत्तात्रय घायाळ व केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती होती.

मान्यवरांनी झगरे यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. याच कार्यक्रमात श्रीमती प्रफुल्लता भिंगोले यांनी जालना जिल्हास्तरीय व्हिडिओ चित्रीकरणात सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल केंद्राच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक पुंगळे,सूत्रसंचालन पऱ्हाड तर आभार घायाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!