दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: जालना गुरुशिष्य परिवाराच्या वतीने जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक स्वास्थ्य,पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गुरुशिष्य पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी राजुर येथील रहिवासी व विल्हाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक विनोद कुमार पांडे यांना जालना येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुशिष्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी गुरुशिष्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष किशोर खंडाळे, प्रसिद्ध उद्योगपती सुनील रायठठा यांच्या शुभहस्ते पांडे यांना समूर्तीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जोशी सर,सुनील ढाकरके,विकास पोथरे, ठाकूर सर, सोमेश कोळी ,नसीम शेख,करुणा हिवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विनोद पांडे यांनी विविध उपक्रम राबवून शाळा आणि ग्रामस्थांचा समन्वय घडवून आणला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. शिक्षकांच्या सहकार्यातून शाळेचे रुपडे पालटले.मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियानामध्ये विल्हाडी जि.प.शाळेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावलेआहे.चंद्रयान प्रकल्प,विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती,आरोग्य शिबिरे,वृक्षारोपण यासारखे उपक्रमात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.यासाठी त्यांना ग्रामस्थ व शिक्षक मित्रांचे सहकार्य लाभले.पांडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
