दर्पण सह्याद्री न्यूज
छत्रपती संभाजीनगर: येथील क्रांतीचौक मधील नव्याने निर्माण केलेल्या शिवसृष्टीमध्ये प्रा.बाळासाहेब बोराडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच डॉ. प्रमोद मैराळ यांना पीएचडी पदवी प्राप्त केल्या बद्दल आणि डॉ. विष्णु पुरी यांनी निसर्ग उपचार पद्धतीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वरील तीनही मान्यवरांचा विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौक येथील शिवसृष्टी मध्ये विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. सुरेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम प्रास्ताविकामधून सिद्धार्थ गायकवाड यांनी सत्कारमूर्तींच्या उल्लेखनीय कार्याचा परिचय करून दिला. यानंतर साईनाथ औंढेकर,सचिन गोसावी, भरत खिल्लारे यांनी आपल्या मनोगतामधून सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक केले.
विद्यार्थी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश राठी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले की प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी सरकारी नोकरीला प्राधान्य न देता शेतकरी, भटक्या,वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून लेखणीला धार दिली. त्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला ही अभिमानाची गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद मैराळ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गरिबीचे भांडवल न करता अंधत्वावर मात करून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी पीएच.डी पदवी मिळवली ही आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.
डॉ.विष्णू पुरी यांनी कोरोना काळामध्ये निसर्गोपचार पद्धतीच्या माध्यमातून शारीरिक व्याधीने हताश झालेल्या त्रस्त लोकांना रुग्णसेवा देऊन त्यांच्या जीवनात जगण्याची उर्मी निर्माण केली. ही अभिमानस्पद गोष्ट आहे.म्हणून त्यांचा गौरव होत आहे असेही प्रा.राठी म्हणाले.
विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.प्रा.बाळासाहेब बोराडे यांचा सत्कार प्रा.सुरेश राठी,डॉ.विष्णू पुरी यांचा सत्कार भरत खिल्लारे,डॉ.प्रमोद मैराळ यांचा सत्कार सिद्धार्थ गायकवाड यांनी केला.
या कार्यक्रमास साईनाथ औंढेकर,सचिन गोसावी,सिद्धार्थ गायकवाड ,भरत खिल्लारे,सौ.आशा खिलारे,डॉ.विष्णु पुरी, डीगांबर भोजने,आर्यन खिल्लारे,समर्थ औंढेकर,आबा, यासह विद्यार्थी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ औंढेकर यांनी केले तर आभार भरत खिल्लारे यांनी मानले.
