दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

***********************************

श्रीक्षेत्र राजूर: महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सोहळा नुकताच जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला असून या वर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार भोकरदन तालुक्यातील व राजुर येथील अंगणवाडी सेविका जयश्री रमेश राऊत-भटकर यांना प्राप्त झाला असून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन जयश्री राऊत-भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्य लेखाधिकारी राजू सोळुंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे साहेब, कृषी अधिकारी भीमराव डोंगरे,आरोग्य अधिकारी श्रीमती इराणी,कार्यकारी अभियंता श्रीमती राजहंस,उप मुख्यअधिकारी श्रीमती कोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी जारवाल साहेब, सुपरवायझर अनुपमा मस्के, मुख्याध्यापक रमेश राऊत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते

अंगणवाडीचा दर्जा सुधारून अंगणवाडी सेविकामध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.अंगणवाडीचे सुशोभीकरण करणे,रेकॉर्ड अद्यावत ठेवणे,बालकांचे कुपोषण आणि मृत्यूदर कमी असणे, पालकास योग्य मार्गदर्शन करणे यासारख्या निकषांवर आधारित हा पुरस्कार दिला जातो.

अंगणवाडी सेविका जयश्री राऊत-भटकर यांनी वरिष्ठ अधिकारी,सहकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून राजूर येथील अंगणवाडी आदर्शवत ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!