दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: विल्हाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विनोदकुमार विक्रम पांडे यांना श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे देण्यात येणार कै. नारायणराव पाटील वाळके जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला असून बदनापूरचे आ.नारायण कुचे,दानकुवर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्रजी गुप्ता , मेस्कोचे प्रदेशाध्यक्ष गजानन पाटील वाळके यांच्या उपस्थितीत पांडे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मंचावर मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील शेळके, मेस्कोचे राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, सरपंच राणी अंभोरे,परमेश्वर अंभोरे, माजी सरपंच सहदेव अंभोरे, दीपक अंभोरे,छावाचे मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण पाटील वाघ, कृष्णा पाटील एखंडे ,भगवान पाटील मात्रे ,पुरस्कार निवड समिती पदाधिकारी शंकर शेरे, मनीषा पाटील, बबनराव बोरुडे, प्रशांत नवगिरे, विष्णू सोनटक्के , ढाकणे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री गजानन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे जालना जिल्ह्यातील शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी बदनापूर तालुक्यातील विल्हाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विनोदकुमार पांडे यांची निवड करण्यात आली होती.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पांडे यांचे शाळेतील शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
