दर्पण सहयाद्र न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रा.बाळासाहेब बोराडे यांना जाहीर झाल्याबद्दल बावणे पांगरी येथे ऋषी महाराज आदर्श विद्यालया तर्फे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे,भाजपा जेष्ठनेते शिवाजीराव थोटे,संस्था अध्यक्ष सुभाषराव बोडखे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रा.बोराडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ऋषी महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सारंगधर बोडखे,सचिव प्रवीण बोडखे,प्रसिद्ध व्यवसायिक विठ्ठलराव टेपले,व्यापारी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे,मोरे मामा, गणेश बावणे,सरपंच गौतम बोर्डे,गणेश महाडिक, गणेश कदम, सुरेश मुटकुळे, प्रा.आसाराम बोटूळे, गणेश बोडखे, नायबराव बोडखे,बळीराम बोडखे,अरविंद बोडखे, लक्ष्मण बोडखे,भगवान शिंदे, सुनील बोर्डे,विष्णू मुटकुळे,कृष्णा नरोडे,प्राचार्य कृष्णा जाधव,उपप्राचार्य संदीप सोनुने यांनी प्रा.बोराडे यांचे अभिनंदन केले.
