दर्पण सह्याद्री न्यूज
(मुंबई)अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व कलेच्या माध्यमातून जगभरात आपली स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध तथा ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा होताच देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनच वर्ष होत आहे.

भारत सरकारद्वारे दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो .चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कलाकार तसेच तंत्रज्ञानामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.या पुरस्कारासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाची घोषणा प्रसारमाध्यमासमोर केली आहे.
आशा पारेख यांना लहानपणापासूनच नृत्य करण्याची आवड होती. पुढे जाऊन त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनेत्री म्हणून चित्रपट सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.आतापर्यंत त्यांनी 95 पेक्षा जास्त चित्रपटात काम करून भारतीय चित्रपटसृष्टीत फार मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या अगोदरही भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून देशभरातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे.
