दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळच असलेल्या लोणगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. गजानन स्वामी आगलावे, तर उपाध्यक्षपदी श्री. संतोष अशोकराव सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मुख्याध्यापक अशोक ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीचे उर्वरित सदस्य खालील प्रमाणे आहेत. त्यामध्ये शामराव बारोकर,संतोष झिने, विष्णू बारोकर, मुनाफ शहा,जगन्नाथ कोरडे,प्रकाश आप्पा तवले, खंडू मगरे,रेखा खरात,वंदना मगरे,शीला साखरे,ज्योती बारोकर आदीजन सदस्य तर वेदिका कदम,अमोल कोरडे यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच राजाभाऊ खरात,उपसरपंच पांडुरंग साखरे,सोसायटी चेअरमन आप्पासाहेब साखरे,माजी सरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य जुमान शहा, समाधान सावंत,विनायक झिने,बळीराम कोरडे,गणेश चांदोडे,मुख्याध्यापक अशोक ढाकणे,शिक्षक श्री मालुसरे आदींनी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.यावेळी शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
