दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिल्या जातात.त्याचाच एक भाग म्हणून बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयात शाळकरी मुलींना सत्तावन्न सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोडखे, उपाध्यक्ष सारंगधर बोडखे,व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सुखानंद पारवे,सचिव रामेश्वर कढवणे,कोषाध्यक्ष भिमाशंकर दारुवले,सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे,भगवान शिंदे,सुनील बोर्डे आदी मान्यवरांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.त्याचप्रमाणे नवनिर्वाचित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
ऋषी महाराज आदर्श विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनी ह्या परिसरातील खेड्यावरून शिक्षणासाठी येतात.शाळेत येण्यासाठी वेळवर वाहन उपलब्ध होत नसल्या कारणाने मुलींना शाळेत जायला अडचणी येत होत्या.काही मुलींच्या शिक्षणात खंड पडत होता. मानव विकास योजनेच्या माध्यमातून विद्यालयाने शाळेपासून अंतरावर राहणार्या ग्रामीण भागातील गरजू मुलींना सत्तावन्न सायकली वाटप करण्यात आल्या.सायकली मिळाल्या बद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास प्राचार्य कृष्णा जाधव, उपप्राचार्य संदीप सोनुने,प्रदीप पाटोळे,लक्ष्मी सोनवणे, शिल्पा जाधव,गुलाब राठोड,अमोल पाटोळे यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
