दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर :शालेय जीवनातील वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच ठरते.सुप्त कलागुणांना वाव देऊन  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोरेश्वर इंग्लिश स्कूलने सांज चिमण पाखरांची वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपला कलाविष्कार सादर केला.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सुविद्य पत्नी सौ.निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिभा भुजंग ,योगीता दानवे,शोभा मतकर, आशा पुंगळे, खुशी दानवे, मंगल मगरे,सुधाकर दानवे, गणेश साबळे, गजानन नागवे,माणिक दानवे,भाऊसाहेब भुजंग, ज्ञानेश्वर पुंगळे ,भगवान नागवे, पंडित पुंगळे ,मुसा सौदागर,रमेश पुंगळे, रामेश्वर सोनवणे, अप्पासाहेब पुंगळे,पंढरीनाथ करपे, रतन ठोंबरे,संतोष मगरे,आकाश पुंगळे, सुनील दानवे ,संतोष सोनुने,राधाकिसन किरड, समाधान माळ ,सलीम शेख ,दीपक घुगे,डॉ. काबरा, डॉ.भंडारी, डॉ. मुलतानी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशास स्मरून करण्यात आली.
या कार्यक्रमातून विदयार्थ्यांनी  भारतीय संस्कृती, वेशभूषा, लोकगीते,देशभक्ती पर गीते,लावणी,विनोद,नाटक,चित्रपट ,
व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.चिमुकल्यांचा अभिनय आणि समाधीटपणा पाहून पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजून विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली .यावेळी विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते समूर्तीचिन्ह, बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.का

र्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक सुनील दानवे, प्राचार्य राधाकिसन किरड,सचिन ठाकूर,भाग्यश्री मालुसरे, अनुराधा मगर यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री मालुसरे व अनुराधा मगर यांनी केले तर आभार सचिन ठाकूर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!