दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: जवळील चांदई एक्को केंद्रातर्गंत केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.ती नुकतीच जि. प .प्रा.शा. चांदई ठोंबरी येथे संपन्न झाली आहे.सर्वप्रथम शिक्षण परिषेदेचे उद्घाटन सरपंच साहेबराव पाटील ठोंबरे, केंद्रप्रमुख आण्णा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक प्रल्हाद पालोदे हे लाभले होते.
सुरवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधून केंद्रप्रमुख अण्णा इंगळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून दिली. त्याच प्रमाणे आजच्या शिक्षण परिषदेमध्ये NAS-2021, PGI, असर अहवाल यांचे सादरीकरण केंद्रप्रमुख आण्णा इंगळे यांनी करून दाखविले.
तदनंतर शिक्षक मंगेश दारूवाले व सोमनाथ कदम यांनी मराठी, इंग्रजी,गणित व परीसर अभ्यास पेटी या बाबतची सविस्तर माहिती देऊन विषयास अनुसरून सादरीकरण केले.केंद्रीय शिक्षण परिषदेसाठी मुख्याध्यापक माधव गंदपवाड, जगन वाघमोडे, ढाकणे ,आर.एच. दानवे,बोंगाने , प्रवीण कुलट , यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
शिक्षण परिषद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कल्पना पवार,श्रीमती अर्चना राजे , श्रीमती वर्षा औताडे, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक गाडेकर, तर आभार बबन घुगे यांनी मानले.
