दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर – बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालयात नुकतेच हृदयस्पर्शी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.सुप्त कलागुणांना वाव देऊन  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .

 जालना कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव बोडखे,भाजपा जेष्ठ नेते शिवाजी थोटे,विठ्ठलराव टेपले,जगन्नाथ थोटे,मोरे मामा,गणेश बावणे,सरपंच गौतम बोर्डे,सरपंच गणेश महाडिक,सरपंच गणेश कदम,सरपंच सुरेश मुटकुळे, संस्थेचे उपाध्यक्ष सारंगधर बोडखे,प्रा.आसाराम बोटूळे, प्रा.बाळासाहेब बोराडे,सचिव प्रवीण बोडखे, गणेश बोडखे, नायबराव बोडखे,बळीराम बोडखे, अरविंद बोडखे, लक्ष्मण बोडखे,भगवान शिंदे, सुनील बोर्डे,विष्णू मुटकुळे,कृष्णा नरोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमातून विदयार्थ्यांनी  भारतीय संस्कृती, वेशभूषा, लोकगीते, देशभक्ती पर गीते,लावणी,हास्यकल्लोळ,नाटक,
चित्रपट व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून   उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर पर्यावरण, स्वच्छता अभियान, महिला सुरक्षा, स्त्रीभ्रूणहत्या,  समाज प्रबोधन या विषयावर प्रकाश टाकुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

तसेच वैष्णवी कदम,राणी चव्हाण,शुभांगी कदम,विद्या घोडकेवैभवी बावणे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील उपक्रमाविषयी माहिती दिली.तर पालकांमधून स्वातीताई हिवाळे आणि मंगलाताई वीर यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

 यावेळी विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते समूर्तीचिन्ह,बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य कृष्णा जाधव,उपप्राचार्य संदीप सोनुने, प्रदीप पाटोळे,लक्ष्मी सोनवणे,शिल्पा जाधव,गुलाब राठोड ,अमोल पाटोळे यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!