दर्पण सह्याद्री न्यूज
– प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथे क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर महाराजांची 892 वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली.महात्मा बसेश्वर उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने विविध समाजभिमुख उपक्रम व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात शिवशक्ती आश्रम तुपेवाडी येथील देवाबाबा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी मंचावर शिवाजीराव पुंगळे,अरविंद थोटे,ज्ञानेश्वर पुंगळे जगनराव पवार,गणेशराव साबळे,जगनराव थोटे,आप्पासाहेब साखरे, पंढरीनाथ करपे, श्रीरामपंच पुंगळे ,प्रा. बाळासाहेब बोराडे, भीमाशंकर आप्पा दारुवाले, कैलास आप्पा गबाळे,पद्माकर चंदनशिवे,नवनाथ फुके,राजू पंडित,दीपक घुगे,जगण वाघमारे, साहेबराव पवार,विलासरावथोटे,बबनराव मगरे, कारभारी टेपले, भगवान ठोंबरे,गजाननअग्रवाल,हरिभाऊ चव्हाण, संतोष पुंगळे,मिलिंद मगरे,हरिदास निकम ,पिंपळे सर, सतीश तवले आदी मान्यवर उपस्थित होते.महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त जगनराव पवार,पंढरीनाथ करपे, पद्माकर चंदनशिवे,कैलासआप्पा गबाळे,जगन्नाथराव थोटे आदी मान्यवरांनी भाषणातून महात्मा बसवेश्वरांच्याजीवनावर प्रकाश टाकला.
महात्मा बसेश्वर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या तसेच सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व रोख वकीशी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये वेदांत जटाळे, संस्कृती तवले,गौरी दारूवाले, श्रावणी दारूवाले ,समृद्धी तवले,अथर्व हिंगमिरे ,आरती हिंगमिरे,वर्षा दारूवाले,रांगोळी स्पर्धेत गौरी दारुवाले , कल्याणी दारूवाले ,श्रावणी लोखंडे, राजनंदिनी मोरे, खुशी हिंगमिरे,सई निकम,पुनम जटाळे, पल्लवी शेटे,पल्लवी दारूवाले,संध्या तायडे,वैष्णवी राठोड, ईश्वरी गवळी आदी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी परीक्षक म्हणून जगन वाघमोडे, विष्णू गवळी , आर.एच. दानवे,सदाशिव दारूवाले,देशमुख सर यांनी काम पाहिले.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे उपाध्यक्ष विनायक कोमटे,संदीप मगरे, सचिव नागेश चिंचोलकर, सहसचिव मयूर हाजबे ,योगेश जितकर,कोषाध्यक्ष पांडुरंग इंगळे ,समितीचे सर्व सदस्य यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाज बांधव तसेच शिवा संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमाशंकर आप्पा दारुवाले, सूत्रसंचालन कैलास अप्पा गबाळे व ॲड.संदिप अप्पा दारूवाले यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर हे कर्ते सुधारक होते- प्रा.बाळासाहेब बोराडे
अध्यक्षीय भाषणाचा समारोप करताना प्रा.बाळासाहेब बोराडे म्हणाले की तरुणांनी महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे.महात्मा बसवेश्वरांनी जातीभेद आणि वर्णव्यवस्था यासारख्या अनिष्ट प्रथाविरुद्ध बंड पुकारून प्रहार केला.महिलांना समानतेची वागणूक दिली. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. अनुभव मंडप संस्थेच्या माध्यमातून जगातील पहिली लोकशाही संसद सुरू केली.त्यामध्ये सर्व समाजघटकांना सामील करून घेतले.म्हणून महात्मा बसवेश्वर हे बोलके नव्हे तर कर्ते समाज सुधारक होते असे मत उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी व्यक्त केले.
