दर्पण सहयाद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे आनंद अनुभूती शिबिर नुकतेच संपन्न झाले असून या शिबिरात राजुरसह परिसरातील विविध गावातील शिबिरार्थी सहभागी झाले होते.शिबिराच्या माध्यमातून साधकांनी आनंदी जीवन जगण्याचा अनुभव घेतला.
श्रीक्षेत्र राजुर येथे २५ ते २८ एप्रिल दरम्यान सकाळी ५ ते ८ या दरम्यान गणपत दादा विद्यालयाच्या प्रांगणात हॅपिनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक राहुल जोशी यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन केले व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध कोर्सची माहिती करून दिली.
आनंद अनुभूती शिबिराच्या माध्यमातून सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार,शारीरिक व बौद्धिक खेळ, योग, प्राणायाम, ध्यान,उज्जयी श्वसन,भस्रिका,सुदर्शन क्रिया यासारख्या योगीक क्रिया शिबिरार्थीकडून करून घेण्यात आल्या.
शिबिराच्या समारोपीय सत्रामध्ये प्रशिक्षक राहुल जोशी म्हणाले की सुदर्शन क्रियामुळे शरीर,मन निरोगी राहते. नकारात्मक भाव नष्ट होतो.माणूस वर्तमानात जगायला शिकतो.त्यामुळे सुखी व आनंदमय जीवनाची अनुभूती येते. आनंद अनुभुती शिबिरातून माणसाचे व्यक्तिमत्व खुलून कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.
या शिबिरात ज्ञानेश्वर पुंगळे,शिवाजी बांदल,बाळासाहेब बोराडे,उद्धव फुंदे,जीवन घुगे,समाधान माळी,महेश देशमुख, गणेश दारूवाले, सदाशिव दारूवाले,भगवान सुद्रिक, अक्षय कुमार जयस्वाल,सचिन तायडे,संदीप होळे, रवी चेके, सचिन तायडे,विश्वंभर वानखेडे,नंदू तायडे,आदी साधकांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रम यशस्वीत्यासाठी उद्धव फुंदेसह अनेकांनी परिश्रम घेतले.शेवटी कार्यक्रमाचे आभार शिवाजी बांदल यांनी मानले.
