दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना:केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे हे कर्नाटक दौऱ्यावर असतांना बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल आश्रमास सदिच्छा भेट देऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तथा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले आहेत.आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमाच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी ना.दानवेंना काही ग्रंथही भेट म्हणून दिली आहेत.
येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणूक आहे. भाजप व मित्रपक्षाचे नेते तळ ठोकून आहेत.कर्नाटक राज्यातील ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अग्निपरीक्षा ठरत आहे.भारतीय जनता पक्षाने आपली व्यूहरचना तयार केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांसह अनेक जेष्ठ नेते कर्नाटकात दाखल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांचाही समावेश होतो.
पक्षाचे नियोजित कार्यक्रम आटोपल्यावर ना.दानवेंनी बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल आश्रमाला सदिच्छा भेट देऊन अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले.ना.रावसाहेब दानवे यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराशी अनेक वर्षांपासूनचे घनिष्ठ संबंध आहेत.
यावेळी आश्रमात श्री श्री रविशंकर यांच्यासह शिष्यगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ना.दानवे यांना आश्रमाद्वारे देशविदेशात चालणाऱ्या सामाजिक,पर्यावरण, आरोग्य,कृषीविषयक,जलसंधारण,अध्यात्मिक व राष्ट्रीय कार्याविषयी माहिती देण्यात आली.श्रीश्री रविशंकर आणि ना.दानवें यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
श्री श्री रविशंकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अध्यात्मिक गुरू आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या माध्यमातून जगभरातील १५६ पेक्षा अधिक देशात अध्यात्मिक कार्य चालू आहे. व्यक्ती ,समाज,राष्ट्र उत्थानासाठी त्यांची सेवा समर्पित आहे.विश्वशांती आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य चालते.
देशातही अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा फार मोठ्या प्रमाणावर आदर आहे. राम मंदिराचा वाद कोर्टा बाहेर आपसात मिटवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली होती. या संदर्भात देशातील शिया,सुन्नी मुस्लिम धर्मगुरूंशी त्यांनी चर्चा केली होती. देशात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता.
बंगलोर येथील आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटरला देश-विदेशातील राजकीय, सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक, धर्मगुरू,मानवतावादी विचारवंत तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती भेट देत असतात.नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी आश्रमास भेट देऊन श्री श्री रविशंकर यांचेआशीर्वाद घेतले आहेत.त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होते.श्री श्री रविशंकर आणि ना.दानवेंच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ना.दानवें समर्थकांमध्ये या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
